

कसाऱ्याजवळ चारचाकी वाहनाचा अपघात
एकाचा मृत्यू; आठ जण जखमी
खर्डी, ता. ७ (बातमीदार) : कसाऱ्याहून मोखाडा-खोडाळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विहीगाव अप्पर वैतरणा धरणाच्या पुलाजवळ एक खासगी वाहन २०० फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, चालकासह आठ जण जखमी झाले आहेत. यामध्ये वाहन धरणाच्या काठावर जाऊन थांबल्याने मोठा अनर्थ टळला.
कसारापासून चौदा किमी अंतरावर असलेल्या माळ गावठा वस्तीतील रेल्वे सेवानिवृत्त कर्मचारी दादू झुगर हे आपल्या कुटुंबासह चारचाकी वाहनाने मंगळवारी (ता. ७) पालघर खोड गावाकडे निघाले होते. विहिगाव सोडताच एका वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन २०० फूट खोल दरीत कोसळले. हे वाहन अप्पर वैतरणा धरणाच्या काठावर असलेल्या खडकावर जाऊन आदळले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी जखमींना दरीतून मुख्य रस्त्यावर आणून नजीकच्या कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविले. यामध्ये चालक सुरेश ठोंबरे यांच्यासह झुगरे कुटुंबातील सात जण जखमी झाले. सन्या ठाकरे, भारती झुगरे, उषा झुगरे, अती झुगरे, अंकिता झुगरे, आदित्य झुगरे, पातळी झुगरे अशी जखमींची नावे असून यात दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यासह इतर दोन जणांवर खर्डी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच शहापूर उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे, नायब तहसीलदार वसंत चौधरी, पोलिस निरीक्षक सुरेश गावित, मंडळ अधिकारी संदीप चौधरी, पोलिस हवालदार देवेंद्र शिरसाठ, राजेश माळी, पोलिस नाईक उमेश चौधरी, कॉन्स्टेबल जी. एस. बोडके, पंढरीनाथ बोरसे आदी मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.