

नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : एपीएमसीतील एकता नगर झोपडपट्टीत गांजाची विक्री करणाऱ्या तिघांची एपीएमसी पोलिसांनी धरपकड केली आहे. मखलान पुत्तन खान (३२) रशीदा समसुद्दीन शेख (२३) व दौलत रफीक दरोगे (२६) अशी या तिघांची नावे असून, त्यांच्याकडून एक लाख ३७ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
एपीएमसी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक एन. व्ही. महाडीक, पोलिस हवालदार चंद्रकांत कदम, काळे व त्यांचे पथक सोमवारी (ता. ६) दुपारी एपीएमसीमध्ये गस्त करत असताना, एकता नगर झोपडपट्टीतील एका झोपडीमध्ये काही पुरुष ये-जा करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने संशयावरून त्या झोपडीवर छापा मारला असता, झोपडीमध्ये एक पुरुष आणि दोन महिला हे समोरील पांढऱ्या गोणीवर पाने, फुले, काड्या, बिया, बोंडे असे संलग्न असलेला गांजा कागदामध्ये ठेवून त्याच्या पुड्या बांधत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेला ६,८३५ ग्रॅम वजनाचा एक लाख ३७ हजारांचा गांजा जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.