

बोरिवली-ठाणे भुयारी मार्ग लवकरच मार्गी लागेल
प्रकाश सुर्वे यांचे प्रतिपादन; बाधितांचे परिसरातच पुनर्वसन
मुंबई, ता. ७ : बोरिवली-ठाणे भुयारी मार्गाच्या आड येणाऱ्या ६५० बाधित झोपडपट्टीवासीयांना घरे देण्याच्या प्रश्नावर लवकरच उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक होणार असल्याने हा प्रश्न निकाली निघून भुयारी मार्ग मार्गी लागेल असे सांगण्यात आले. बोरिवली-ठाणे भुयारी मार्गामुळे बाधित होणाऱ्या ६५० झोपडपट्टीवासीयांना मागाठाण्यातच पर्यायी घरे द्यावीत, अशी मागणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत केली. या विभागात महाडा प्राधिकरणाचे दोन भूखंड असून, तेथे एमएमआरडीएतर्फे सुसज्ज घरे बांधून नागरिकांना दिलासा द्यावा, असे सुर्वे यांनी सुचवले. त्यानुसार लवकरच म्हाडा, एसआरए व एमएमआरडीए यांची संयुक्त बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आयोजित करण्याचे निर्देश मुखर्जी यांनी दिले आहेत. या भुयारी मार्ग प्रकल्पात बोरिवली पूर्वेला टाटा पॉवर परिसरात ६५० झोपड्या बाधित होणार आहेत. येथील भारद्वाज विकसकाच्या प्रकल्पात ३२५ रहिवाशांना घरवाटप पत्रे देण्यात येतील आणि तीन वर्षांचे आगाऊ भाडे देण्यात येईल. उरलेल्या ३२५ बाधितांनाही परिसरातच घर द्यावे, असे सुर्वे यांच्याकडून सुचवण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.