

मिठाईतून गुंगीचे औषध देत अत्याचार
नराधमाला उत्तर प्रदेशमधून ठोकल्या बेड्या
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : मिठाईतून गुंगीचे औषध देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. पीडित मुलगी व तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देत नराधम वारंवार अत्याचार करत होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी त्याचा शोध घेत उत्तर प्रदेश येथून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. संदीप कुमार (वय ३२) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी व अत्याचार करणारा इसम हे उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून, एकमेकांना ओळखत होते. भंगार गोळा करून ते आपली उपजीविका करत होते. संदीप हा पीडित मुलीच्या घराशेजारीच राहत होता. जानेवारी २०२२ पासून तो पीडित मुलीला त्रास देत होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये संदीप याने पीडितेला मिठाईमधून गुंगीचे औषध देत तिच्यावर राहत्या घरात अत्याचार केला. त्यानंतर तिला व तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करत होता. वारंवार होणाऱ्या अत्याचारामुळे पीडितेने मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत डिसेंबर २०२४ मध्ये संदीपविरोधात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत संदीप याचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, आरोपी त्याच्या मूळगावी उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील एका गावात पळून गेला असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली.
..
आरोपीला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात
मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाची माहिती उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील एसटीएफ पथकाला दिली. या पोलिस पथकाने ४ जानेवारीला ग्राम मरवटीया कुर्मी गावच्या हद्दीत सापळा रचून आरोपी संदीपला ताब्यात घेतले. त्यानंतर कपिलवास्तु पोलिस ठाण्यात त्याला ताब्यात घेतल्याची माहिती नोंद करून ६ जानेवारीला उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपीला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.