सोनाराच्या दुकानावर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक

सोनाराच्या दुकानावर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक
Published on

सोनाराच्या दुकानावर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक
पडघा, ता. ७ (बातमीदार) : शहापूर येथील सोनाराच्या दुकानावर चोरीच्या उद्देशाने गोळीबार करून सोनाराची बॅग घेऊन पळून गेलेल्या दोन जणांना अटक करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.
पंडित नाका, शहापूर येथील महालक्ष्मी ज्वेलर्स या सोनाराच्या दुकानावर २१ डिसेंबर रोजी चोरीच्या उद्देशाने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार करून सोनाराची बॅग घेऊन पळ काढला. या गोळीबारात दुकानात काम करणारा दिनेश चौधरी या तरुणाचा मृत्यू झाला. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासासाठी पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलिस अधीक्षक भरत तांगडे, उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची १२ पथके तयार करण्यात आली होती. यामध्ये सीसीटीव्ही फुजेट, गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे शशांक ऊर्फ सोनू बलराम मिश्रा (वय ३२, रा. उत्तर प्रदेश), तौसीफ आलम कबीरुद्दीन सिद्धकी (वय ३५, रा. सिरोही, उत्तर प्रदेश) येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com