सेन्सेक्समध्ये २३४ अंशांची वाढ

सेन्सेक्समध्ये २३४ अंशांची वाढ
Published on

सेन्सेक्समध्ये २३४ अंशांची वाढ
निफ्टीही थोडा वरच्या दिशेला

मुंबई, ता. ७ : काल मोठी पडझड झालेल्या भारतीय शेअर बाजार निर्देशांकात आज पाव टक्क्यापेक्षा जास्त वाढ झाली आणि त्याने कालचा तोटा थोडासा भरून काढला. आज सेन्सेक्स २३४.१२ अंश तर निफ्टी ९१.८५ अंश वाढला.
जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे आज सकाळी भारतीय शेअर बाजार नफ्यात होते; मात्र नंतर त्यांच्यात थोडी नफावसुली झाली. आज सेन्सेक्सने काही काळ अठ्याहत्तर हजारांचा स्तरही खालच्या दिशेने तोडला होता. दिवसअखेर त्याने तो स्तर कसाबसा टिकवून ठेवला. दिवसअखेर सेन्सेक्स ७८,१९९.११ अंशावर तर निफ्टी २३ हजार ७०७.९० अंशांवर स्थिरावला. आर्थिक क्षेत्राचे शेअर सोडून अन्य सर्व क्षेत्रे आज वाढली. ऑइल अँड गॅस, बांधकाम व्यवसाय, ऊर्जानिर्मिती, बँका, धातूनिर्मिती, औषधनिर्मिती ही क्षेत्रे अर्धा ते एक टक्का वाढली. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉल कॅपही अनुक्रमे एक व सव्वा टक्का वाढले. आजही परदेशी वित्त संस्थांनी १,४९१ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली, तर देशी वित्त संस्थांनी १,६१५ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. सेन्सेक्समधील टाटा मोटर, रिलायन्स इंडस्ट्रीज या शेअरचे भाव दोन ते सव्वादोन टक्के वाढले. इंडसइंड बँक, नेसले, आयसीआयसीआय बँक, टायटन, एशियन पेंट, लार्सन अँड टुब्रो, अदाणी पोर्ट, अल्ट्राटेक सिमेंट एक ते सव्वा टक्के वाढले. दुसरीकडे झोमॅटो साडेचार टक्के घसरला. एचसीएल टेक, टीसीएस पावणेदोन ते दोन टक्के आणि टेक महिंद्र एक टक्के घसरला.
...
एचएमपी विषाणूमुळे आरोग्य क्षेत्राच्या शेअरकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या क्षेत्राचा नफा वाढू शकेल. या विषाणूचा प्रवास तसेच कंपन्यांचे निकाल यामुळे शेअर बाजार विशिष्ट टप्प्यात फिरत राहील.
- सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्स सर्व्हिसेस
...
सोने ७०० रुपयांनी वाढले
सोन्याच्या भावात आज ७०० रुपयांनी वाढ होऊन तो प्रतिदहा ग्रॅमला ७९ हजार ७०० रुपयांवर गेला. दागिन्यांचे व्यापारी तसेच छोट्या विक्रेत्यांनीही खरेदी केल्यामुळे सोन्याचा भाव वाढल्याचे ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आज चांदीचे भावही वाढून ९२ हजार रुपये किलोपर्यंत पोहोचले. परदेशात झालेली मोठी खरेदी तसेच देशांतर्गत मागणी वाढल्याने सोने, चांदीचे दर वाढत आहेत. त्यातच अमेरिकेच्या नव्या अध्यक्षांच्या धोरणाबाबत अनिश्चितता असल्याने सोन्याचे भाव वाढतील, असे तज्ज्ञांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com