शेकापचे खजिनदार प्रीतम म्हात्रे यांचा वाढदिवस साजरा

शेकापचे खजिनदार प्रीतम म्हात्रे यांचा वाढदिवस साजरा

Published on

उरण, ता. १६ (बातमीदार) : शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा खजिनदार प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त उलवे नोड येथे विविध सामाजिक उपक्रम पार पडले. उलवे येथील आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि महिला मंडळ, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती सेक्टर १६, नवयुग मित्र मंडळ सेक्टर नऊ, श्री गणेश सार्वजनिक मित्र मंडळ सेक्टर १७, सेक्टर आठ रहिवासी संघटना यांच्या वतीने प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आणि ऑल इज वेल वृद्धाश्रमात फळवाटपासह इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जितेंद्र म्हात्रे, सचिन राजे, सुहास देशमुख, प्रल्हाद भगत, रोहन खंडू, महेश मगर, मिलिंद डोके, साई पैकडे, सावळाराम नलावडे, राकेश करगुटकर, अशोक फाटक, प्रमोद भगत यांच्यासह उलवेतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com