नागरी सुविधा केंद्रात टोकन पद्धत

नागरी सुविधा केंद्रात टोकन पद्धत

Published on

नागरी सुविधा केंद्रात टोकन पद्धत
जी दक्षिण विभाग कार्यालयात रांगांपासून सुटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ ः एल्फिन्स्टन येथील ना. म. जोशी मार्गालगत असलेल्या पालिकेच्या जी दक्षिण विभाग कार्यालयात नागरी सुविधा केंद्रात पहिल्‍यांदाच टोकन प्रणालीचा वापर सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिकांचा रांगेचा अडथळा दूर झाला आहे. मुंबईतील महापालिकेच्या इतर नाग‍री सुविधा केंद्रांमध्येही टोकन प्रणालीचा वापर करावा, अशी सूचना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केली आहे.
पालिकेच्या जी दक्षिण विभाग कार्यालयास पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी भेट देऊन नागरी सुविधा केंद्राच्या कामकाजाची पाहणी केली. या नागरी सुविधा केंद्रात पहिल्‍यांदाच टोकन प्रणालीचा वापर सुरू झाला आहे. प्रत्येक विभाग कार्यालयात (वॉर्ड) सुसज्‍ज नागरी सुविधा केंद्र आहेत. या ठिकाणी सामान्‍य मुंबईकर नागरिक विविध दाखल्‍यांसाठी, कागदपत्रांसाठी येत असतात. त्‍यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी असते. दोन ते तीन तास रांगेत थांबल्यानंतरही नंबर येईल का, याची शाश्वती नसते.
कामासाठी भरपूर वेळ खर्ची पडत असल्याने प्रसंगी वादावादीचे प्रकारही घडत असल्‍याच्‍या तक्रारी आहेत. नागरी सुविधा केंद्रात होणारी गर्दी लक्षात घेऊन, नागरिकांचा त्रास कमी होण्यासाठी नियोजन केले पाहिजे. सामान्‍य नागरिक डोळ्यासमोर ठेवून नागरी सुविधा केंद्रांची रचना केली पाहिजे. कागदपत्रांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत. कमी वेळेत, कमी खर्चात नागरी सुविधा उपलब्‍ध करून द्याव्‍यात, असे निर्देश पालिका आयुक्‍त गगराणी यांनी दिले आहेत. जी दक्षिण विभाग कार्यालयाच्‍या धर्तीवर इतर सर्व नागरी सुविधा केंद्रांमध्‍ये टोकन प्रणाली राबवावी, असे निर्देशही गगराणी यांनी दिले आहेत.
नागरिकांसाठी हिरकणी कक्ष, पिण्याचे गार पाणी, प्रतिसाद पेटी आदी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या सेवासुविधांची गगराणी यांनी पाहणी केली. सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांच्‍यासह संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com