मेट्रो-३ च्या स्थानकात दिसणार व्यवसायिक दुकाने

मेट्रो-३ च्या स्थानकात दिसणार व्यवसायिक दुकाने

Published on

मेट्रो-३ च्या स्थानकात दिसणार व्यावसायिक दुकाने
एमएमआरसीएलकडून १.३ लाख चौरस फूट व्यावसायिक जागा वितरित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मेट्रो-३ आरे-कुलाबा या भुयारी मेट्रो मार्गावरील स्थानकात आता वेगवगेळ्या खाद्यपदार्थांबरोबरच व्यावसायिक दुकाने दिसणार आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या आर्थिक उत्पन्नात भर टाकण्याबरोबरच स्थानकावरील उपलब्ध असलेल्या जागेचा उपयोग व्हावा, यासाठी सुमारे १.३ लाख चौरस फूट व्यावसायिक जागा भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. या जागा खुल्या निविदा प्रक्रियेद्वारे खाद्य व पेय (फूड अँड बेव्हरेज), रिटेल, बँक एटीएम आणि व्हेंडिंग मशीन यांसारख्या विविध व्यावसायिक क्षेत्रांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
एमएमआरसीएलने भाडेतत्त्वावर दिलेल्या जागांमध्ये सुमारे ४० हजार चौरस फुटांच्या मोठ्या फ्लोअरपासून १०० चौरस फुटांच्या लहान छोट्या दुकानांचादेखील समावेश आहे. टाटा ट्रेंट, इंडिया रिटेल अँड हॉस्पिटॅलिटी, नमन ग्रुप, अमर टी, वारणा सहकारी, रोजिअस रिटेल, मिस्टिकल ग्रुप, डेलिसिया फूड्स, आणि चितळे बंधू यांसारख्या प्रमुख उद्योग समूहांनी या जागा घेतल्या आहेत. सदरच्या जागा मेट्रो-३ स्थानकांच्या महत्त्वाच्या ठिकाणी असल्याने व भविष्यात या मार्गावरील वाढणारी प्रवासीसंख्या लक्षात घेता या निविदेला अनेक नामांकित उद्योग समूहाचा भरघोस प्रतिसाद मिळाला. भाडे उत्पन्नाच्या व्यतिरिक्त इतर स्रोतांमधून मिळणारी कमाई मेट्रोचे तिकीटदर वाजवी ठेवण्यासाठी उपयोगी ठरेल. त्‍यामुळे मेट्रो प्रवाशांसाठी अधिक सुलभ आणि फायदेशीर होईल व मुंबईत सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यावरणपूरक पर्यायाचा वापर वाढेल, असे एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com