बेलापूरमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई

बेलापूरमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई

Published on

वाशी, ता. १८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या बेलापूर विभागामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाई केली. बेलापूर गाव सेक्टर २०मधील घर क्रमांक ४०४ येथे आदेश वाघमारे, शहाबाज गाव सेक्टर १९मध्ये महेश कुंभार, फणसापाडा येथील घर क्रमांक ५७४ मध्ये नान्हे अन्सारी व सेक्टर २०मधील मधुकर म्हात्रे यांनी बेकायदा बांधकाम सुरू केले होते. नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण नियंत्रण विभागाने कारवाई केली. सहाय्यक आयुक्त डॉ. अमोल पालवे यांच्या नियंत्रणाखाली कनिष्ठ अभियंता आत्माराम काळे, प्रशासकीय अधिकारी रमेश राठोड आदी अनधिकृत बांधकामांवरील कारवाईसाठी उपस्थित होते. या वेळी १५ मजूर, एक मुकादम, एक जेसेबी, दोन हॅमर व एक गॅस कटर असा फौजफाटा तैनात होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com