आरटीई प्रवेश अर्जाला २७ जानेवारीची मुदत
वाशी, ता. १८ (बातमीदार) : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी आरटीईअंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी २७ जानेवारीची मुदत देण्यात आली आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अडचणींच्या निराकरणासाठी पालिकेने गटनिहाय केंद्र समन्वयकांची नियुक्ती केली आहे.
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलिस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानित) आणि महापालिका शाळांमध्ये (स्वयंअर्थसहाय्यित शाळा) पहिलीच्या वर्गात २५ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. यंदाच्या प्रवेशासाठी १४ जानेवारीपासून ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, २७ जानेवारीपर्यंतच अर्ज भरता येणार आहेत. यासाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal ही वेबसाईट देण्यात आली आहे. प्रवेशाच्या मार्गदर्शक सूचना पोर्टलवर दिल्या आहेत. नवी मुंबईतील पालकांसाठी पालिकेने ऑनलान प्रवेश अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी nmmcrte२५@gmail.com हा ई-मेल आयडी देण्यात आला आहे. याकरिता गटनिहाय केंद्र समन्वयक नियुक्त करण्यात आले असून, त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
--------------------
गटनिहाय केंद्र समन्वयकांची यादी
केंद्राचे नाव केंद्र समन्वयक मोबाईल क्रमांक
नेरूळ/बेलापूर रेखा पाटील ९८७००३५९००
तुर्भे महेंद्र पाटील ९००४१६२३२३
इंदिरानगर जयमाला पाटील ९९६७२८११०३
घणसोली संजय मोरे ८४३३८४१४४६
कोपरखैरणे चंदप्रकाश पाल ८१०८९३२८९५
कातकरीपाडा रमेश तेली ९८६७४९५०६०
ऐरोली सुप्रिया पायरे ९८१९१७६२२६
दिघा अविनाश जाधव ९६१९८५७३३२
शिरवणे रंजना साळी ८१०८०८७३७१
वाशी प्रशांत म्हात्रे ९३२१५२५२८८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

