प्रकल्प नियोजित वेळेत मार्गी लावण्याच्या खासदारांच्या सूचना

प्रकल्प नियोजित वेळेत मार्गी लावण्याच्या खासदारांच्या सूचना

Published on

शहरातील महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा
मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात बैठक

कल्याण, ता. १८ (वार्ताहर) : कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या भागात वाहतूक आणि दळणवळणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. या वेळी कल्याण रिंगरोड, मेट्रो मार्ग १४ चा सविस्तर प्रकल्प आराखडा, मेट्रो ५ आणि मेट्रो १२ ची प्रगती, ठाणे फ्री वे, तसेच उल्हासनगर, अंबरनाथ आणि कल्याण-डोंबिवली परिसरात सुरू असलेल्या अनेक विकासकामांचा आढावा घेतला. सर्व प्रकल्पांचा आढावा घेत त्यांच्या पूर्णत्वासाठी योग्य त्या सूचना दिल्या, तसेच या प्रकल्प उभारणीतील अडचणींवर तोडगा काढत हे प्रकल्प नियोजित वेळेत मार्गी लावण्यास सांगितले.

बैठकीत महत्त्वाचे प्रकल्प आणि त्यासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण, कामांची पूर्तता आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी येत असलेल्या अडचणी या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. प्रकल्पांना गती द्यायची असेल, तर लवकरात लवकर जमीन अधिग्रहण करा, अशी सूचनाही या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. बदलापूर-कांजुरमार्ग मेट्रो मार्ग १४ चा फायदा अधिकाधिक भागाला कसा होईल, त्यासाठी मार्गाच्या आरेखनात बदल करता येईल का, याची चाचपणी करण्याची सूचना केली. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील ३८० कोटी रुपये खर्चातून उभारण्यात येत असलेल्या रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला.

बैठकीला अतिरिक्त आयुक्त मुद्गल, अतिरिक्त महानगर आयुक्त मनुज जिंदाल, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड, उल्हासनगर महापालिका आयुक्त जमीर लेंगरेकर, ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, तसेच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, प्रशांत काळे, नीलेश शिंदे, नवीन गवळी, अरुण आशान, राजेंद्र चौधरी, वामन म्हात्रे आदी पदाधिकारीही उपस्थित होते.

''यू टाईप'' रस्त्यांना गती
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व भागातील ''यू टाईप'' रस्त्यांना गती देण्याच्या सूचना केल्या. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील वर्दळीच्या शहाड उड्डाणपूल रुंदीकरणाची निविदा जाहीर केली आहे. त्यासाठी आवश्यक जागेचे अधिग्रहण तातडीने करण्याच्या सूचना उल्हासनगर पालिका आयुक्तांना दिल्या. उल्हासनगर पालिका क्षेत्रातील प्रमुख सात रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. कल्याण फाटा उड्डाणपूल आणि ऐरोली-काटई फ्री वे या प्रकल्पांसाठी वेगाने जागा अधिग्रहीत करण्याची सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com