महिलेवर लैंगिक अत्याचार
महिलेवर लैंगिक अत्याचार
अंधेरी, ता. १८ (बातमीदार) ः शिकवणीच्या बहाण्याने एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिच्याकडून घेतलेल्या पावणेनऊ लाखांचा अपहार करून तिची फसवणूक केल्याचा प्रकार मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अमजद शेख याच्याविरुद्ध मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
३१ वर्षांची पीडित महिला मालाडच्या मालवणी परिसरात राहते. दोन वर्षांपूर्वी तिची आरोपीशी ओळख झाली होती. तिच्या मुलांना धार्मिक शिक्षण देण्याचा बहाणा करून तो तिच्या घरात अधूनमधून येत होता. त्यातून त्यांची चांगली ओळख झाली होती. सप्टेंबर २०२२ मध्ये गुंगीचे औषध देउन त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार लक्षात येताच त्याने माफी मागून लग्न करण्याचे आश्वासन दिले होते, तसेच तिच्याकडून आठ लाख रुपये घेऊन परत केले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

