ग्रंथाभिसरणमध्ये सामूहिक वाचन

ग्रंथाभिसरणमध्ये सामूहिक वाचन

Published on

ग्रंथाभिसरणमध्ये सामूहिक वाचन
शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग
अंबरनाथ, ता. १८ (बातमीदार) : राज्य सरकारच्या ''वाचन संकल्प महाराष्ट्राचा'' या उपक्रमांतर्गत ग्रंथाभिसरण मंडळ सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांना वाचक, तसेच शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रंथालयात १ ते १५ जानेवारी या कालावधीत वाचन पंधरवडा साजरा करण्यात आला. वाचनाची गोडी लावण्यासाठी सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद आणि ग्रंथ प्रदर्शन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

सामूहिक वाचन उपक्रमात रसिक साहित्यप्रेमी वाचकांना भावलेले, आवडलेले कोणतेही पुस्तक वाचनासाठी दिले होते. स्वलिखित कविता, दिवाळी अंक साहित्य, पुस्तक परीक्षण, ललित लेख, विनोदी लेख, संत साहित्यावरील निरूपण, प्रवास वर्णन इत्यादी साहित्य प्रकारातील ग्रंथांचे या वेळी सामूहिक वाचन करण्याचा आनंद वाचकांनी घेतला. वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद व ग्रंथ प्रदर्शन या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ''वाचन कौशल्य कार्यशाळा व वाचन संवाद'' या कार्यकमाचे आयोजन केले होते. या वेळी पी. डी. कारखानीस कला, वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते.

विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचे व ग्रंथांचे महत्त्व पटवून देण्यासाठी अविनाश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनखाली वाचन कौशल्य कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या वेळी स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे प्रदर्शनही भरविले होते. शालेय विद्यार्थ्यांसाठी पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धेचे आयोजन केले होते. या वेळी शिवाजी आबाजी कोळकर विद्यालयातील ३१ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांचे अगदी मोजक्या शब्दांत समर्पक वर्णन केले. या स्पर्धेला परीक्षक म्हणून लेखक दत्ता जोशी व भोळे यांनी काम पाहिले. मेघनाथ नरळे, लावण्या पवार, इशिका राजेश अमृतकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. प्रशांत कर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com