खासदार संजय पाटील यांच्या वाढदिवसाला दिग्गज नेत्यांची हजेरी
खासदार संजय पाटील यांच्या वाढदिवसाला दिग्गज नेत्यांची हजेरी
मुलुंड, ता. १८ (बातमीदार) : महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांचा वाढदिवस १६ जानेवारी रोजी त्यांच्या भांडुप येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त लाखो चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी राजकीय नेत्यांनी तसेच महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. लोकसभेच्या निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत संजय दिना पाटील खासदार झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच वाढदिवस होता. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांसह सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यानिमित्ताने खासदार पाटील यांच्या निवासस्थानापासून ते एलबीएस मार्गापर्यंत विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
या वेळी विधान परिषद सदस्य सचिन अहिर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विक्रोळीचे आमदार सुनील राऊत, माजी आमदार रमेश कोरगावकर, राजन विचारे, केदार दिघे, शिवसेना विभागप्रमुख सुरेश पाटील, राष्ट्रवादी पक्षाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव, शिवसेना शिंदे गटाचे भांडुपचे आमदार अशोक पाटील आणि इतर राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी खासदार संजय दिना पाटील यांना उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
MUM25E75771
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

