महाराष्ट्र ‘अंनिस’चे सभासद नोंदणी अभियान
नेरूळ, ता. १८ (बातमीदार) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नवी मुंबईतील सानपाडा शाखेतर्फे शनिवारी (ता. १८) सभासद नोंदणी अभियान राबवण्यात आले. नेरूळ सेक्टर नऊमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ हे अभियान पार पडले. या वेळी पदाधिकाऱ्यांनी अंनिसच्या प्रबोधनात्मक कामाची ओळख करून दिली. महाराष्ट्र अंनिस समाजाला डोळस बनवते. भाबडेपणाने वागण्यामुळे आपल्या जीवनाचे नियंत्रण दुसऱ्याकडे जाण्यात परावर्तित होऊ शकते. म्हणून स्वतः तपासून घेऊन, आपले जीवन विवेकी बनवू या, असे आवाहन अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी केले. अंनिसतर्फे ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ हे मासिक नियमित प्रकाशित केले जाते. या मासिकाच्या माध्यमातून आपल्या शहरातील, जिल्ह्यातील, राज्यातील, देशभरातील अंधश्रद्धा मांडल्या जातात. समाजाला जागृत करण्याचे काम आपण आपल्या पातळीवर करावे. या कामाचा भाग म्हणून महाराष्ट्र अंनिसशी जोडून घेणे गरजेचे आहे. यासाठी सभासद नोंदणी अभियान राबवण्यात आल्याचे सांगण्यात आले. सभासद नोंदणी अभियानात राजेंद्र पंडित, किरण जोशी, दीपरत्न सुरडकर व अशोक निकम यांनी सहभाग नोंदवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

