बुलेट ट्रेनचे कामवेळेत पूर्ण होणार

बुलेट ट्रेनचे कामवेळेत पूर्ण होणार

Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १८ ः मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम विक्रमी वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विवी वैष्णव यांनी व्यक्त केला. महापे येथे सुरू असलेल्या बोगद्याची शुक्रवारी त्यांनी पाहणी केली.
मुंबई-अहमदाबाददरम्यान बुलेट ट्रेनच्या मार्गावर २१ किलोमीटर अंतराचा एक जलभुयारी मार्ग आहे. समुद्राच्या खालून जाणारा देशातील हा पहिला मार्ग असून, प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. ठाणे खाडीच्या खालून जाणाऱ्या बोगद्याचा सात किलोमीटरचा भाग हा महापे येथे संपतो. यापैकी महापे येथील दोन किलोमीटरच्या कामाची वैष्णव यांनी पाहणी केली. या भुयारी मार्गातून २५० प्रतितास वेगाने दोन ट्रेन एकत्र धावतील, अशी रचना तयार केली आहे. तसेच बोगद्यामध्ये सुरक्षाविषयक बाबी आणि हवा खेळती राहण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. परवडणाऱ्या दरात बुलेट ट्रेनचा प्रवास उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा मानस असल्याचे वैष्णव यांनी सांगितले. तसेच बुलेट ट्रेनमुळे अवघ्या अडीच तासांत अहमदाबादहून मुंबईला येणे शक्य होणार आहे. त्यामुळे शहरे विकसित होण्यास मदत होणार असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.
--------------------------------------
बीकेसीत अत्याधुनिक स्थानक
मुंबई-अहमदाबाद मार्गावर ३४० किलोमीटरचे काम प्रगतिपथावर आहे. नद्यांवरचे पूल आणि रेल्वे स्थानकांचे काम वेगात सुरू आहे. बीकेसी येथील रेल्वे स्थानक स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असणार आहे. जमिनीच्या खाली १० मजली आणि जमिनीवर सातमजली अशा स्वरूपाची स्थानकाची इमारत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com