प्रशासकीय राजवटीत विकासकामांना गती
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : ठाणे महापालिका बरखास्त होऊन त्यावर प्रशासकीय राजवट सुरू आहे. प्रशासकीय राजवटीत प्रशासनाकडून शहरातील विविध विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे. त्यांचे प्रस्ताव तयार करून महासभेसह स्थायी समितीच्या सभेत मांडण्यात येत आहे. त्यानुसार मागील तीन वर्षांत ठाणे पालिकेने १५५ महासभा आणि १७७ स्थायी समितीच्या बैठका झाल्या असून आतापर्यंत तीन हजार ७२४ विविध विकासप्रकल्पांचे प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे पालिका ५ मार्च २०२२ पासून बरखास्त झाली आहे. त्यावर प्रशासकीय राजवट सुरू आहे. या कालावधीत शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय कसे घेतले जातात. महासभा, स्थायी समितीच्या बैठका होतात की नाही. नगरसेवकांची मुदत संपली, तरी शहराशी संबंधित विविध मुद्द्यांवर निर्णय कसे होतात? राबवण्यात येणारे विविध प्रकल्प, नागरिकांच्या पाणी, रस्ते, शौचालय, आदी समस्यांबाबत निर्णय कसे होतात, असे अनेक प्रश्न नागरिकांना पडणे वावगे नाही. मात्र, प्रशासनाच्या माध्यमातून महासभा व स्थायी समितीच्या बैठका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार पडतात. या बैठकांमध्ये महत्त्वांच्या विषयांवर चर्चा करून विकासकामे व प्रकल्पांचे प्रस्ताव तयार करून त्याला मंजुरी देण्यात येत असते. तीन वर्षांत ठाणे पालिकेचे आयुक्त म्हणून विपिन शर्मा, अभिजित बांगर आणि आता सौरभ राव कामकाज पाहत आहे. या आयुक्तांच्या कार्यकाळात १५५ महासभा आणि १७७ स्थायी समितीच्या बैठका झाल्या. आतापर्यंत सुमारे तीन हजार ७२४ विविध विकासप्रकल्पांचे प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

