वीज कंपन्यांचा बहुवार्षिक वीज दर निश्चितीचा प्रस्ताव एमईआरसीला सादर

वीज कंपन्यांचा बहुवार्षिक वीज दर निश्चितीचा प्रस्ताव एमईआरसीला सादर

Published on

वीज कंपन्यांचा बहुवार्षिक वीजदर निश्चितीचा प्रस्ताव एमईआरसीला सादर
- अदाणीची वर्षाला ११ हजार कोटी, टाटाची पाच हजार, तर बेस्टची ४,६०० कोटींची मागणी; पहिल्या वर्षी ग्राहकांना दिलासा मिळणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : बहुवार्षिक वीजदर निश्चिती अंतर्गत २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षांतील महसुली तुट तर २०२५-२६ ते २०२९-३० या पाच वर्षांसाठी आवश्यक असलेल्या महसुलाची मागणी करीत अदाणी इलेक्ट्रिसिटी, टाटा पाॅवर आणि बेस्टने वीज नियामक आयोगाकडे (एमईआरसी) वीजदर निश्चितीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामध्ये अदाणीने वार्षिक सुमारे ११ हजार कोटी रुपये, टाटाने पाच हजार कोटी रुपये तर बेस्टने ४,६०० कोटी रुपयांच्या महसुलाची मागणी केली आहे. त्यावर वीज आयोगाने ग्राहकांकडून सूचना व हरकती मागवल्या आहेत.
वीज कायद्यातील तरतुदीनुसार आणि एमईआरसीच्या विनियमातील तरतुदीनुसार वीजनिर्मिती, वीजवहन आणि वीज वितरण कंपन्यांना आवश्यक असलेल्या महसुली गरजेचा प्रस्ताव वीज आयोगाला सादर करून त्याला मंजुरी घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार २०२५-२०२६ ते २०२९-२०३० पर्यंतच्या बहुवार्षिक महसुली गरजेचा प्रस्ताव वीज कंपन्यांनी वीज आयोगाला सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरांत वीज वितरण करणाऱ्या कंपन्यांनी आपला प्रस्ताव आयोगाकडे दिला आहे. त्यावर वीज ग्राहक किंवा संस्थांना १० फेब्रुवारीपर्यंत आपल्या सूचना-हरकती वीज आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अपलोड करता येणार आहेत. तसेच सचिव, महाराष्ट्र वीज नियामक आयोग, १३वा मजला, केंद्र क्रमांक १, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई ४००००५ या पत्त्यावर पाठवावे, असे आवाहन केले आहे.

टाटा पाॅवरच्या प्रस्तावात काय
टाटा पाॅवरने २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन आर्थिक वर्षांतील महसुली तुटीपोटी सुमारे १२४ कोटी रुपयांची मागणी केली आहे. तसेच पुढील पाच वर्षांकरिता प्रत्येक वर्षाला पाच हजार कोटी रुपयांहून अधिक महसुलाची मागणी केली आहे. तसेच वीज ग्राहकांना प्रत्येक महिन्याच्या बिलात लावल्या जाणाऱ्या स्थिर आकारात दरवर्षी १० रुपयांची वाढ प्रस्तावित आहे.

वार्षिक महसुलाची मागणी
२०२५-२६ ------ ४,९३१ कोटी रुपये
२०२६-२७ ------ ५,००४ कोटी रुपये
२०२७-२८ ------ ५,३०९ कोटी रुपये
२०२८-२९ ------- ५,७८३ कोटी रुपये
२०२९-३० -------- ५,७२७ कोटी रुपये
----
घरगुती ग्राहकांच्या विजेचा दर (रुपये)
वीज वापर (युनिट) - सध्याचा दर - २०२५-२६ - २०२६-२७ - २०२७-२८ - २०२८-२९ - २०२९-२०३०
०-१०० - २.१८ - २.१५ - २.०० - १.९५ - १.९५ - १.७०
१०१-३०० - ५.३६ - ५.३५ - ५.१० - ५.०५ - ५.१५ - ४.५०
३०१-५०० - ११.६२ - ९.२० - ८.७० - ८.५० - ८.७० - ८.१०
--------------------------

अदाणीच्या प्रस्तावात काय?
अदाणी इलेक्ट्रिसिटीने प्रस्तावात २०२२-२३ ते २०२३-२४ या आर्थिक वर्षातील महसुली तुटीपोटी सुमारे ५६० कोटी रुपयांची मागणी केला आहे. त्याचबरोबर पुढील पाच वर्षांचा विचार करता प्रत्येक वर्षासाठी सुमारे १० हजार ८६८ कोटी रुपयांपासून १६ हजार ६८७ कोटी रुपयांच्या महसुलाची मागणी केली आहे. अदाणीचा प्रस्ताव पाहता सध्याच्या वीजदराचा विचार करता २०२५-२६ या वर्षात विजेचे दर कमी होणार असले तरी त्यापुढे चार वर्षांत काही अंशी वाढ होणार असल्याचे दिसत आहे. तसेच वीजबिलात लागणाऱ्या स्थिर आकारात पहिल्या दोन वर्षांत २५ रुपयांची तर त्यानंतर वर्षाला २० रुपयांची वाढ करावी. असा प्रस्ताव दिला आहे.
----
वार्षिक महसुलाची मागणी
२०२५-२६ ------ १० हजार ८६८ कोटी रुपये
२०२६-२७ ------ ११ हजार ८७१ कोटी रुपये
२०२७-२८ ------ १३ हजार ७०१ कोटी रुपये
२०२८-२९ ------- १४ हजार ९७६ कोटी रुपये
२०२९-३० -------- १६ हजार ६८७ कोटी रुपये
----
घरगुती ग्राहकांच्या विजेचा दर (रुपये)
वीज वापर (युनिट) - सध्याचा दर - २०२५-२६ - २०२६-२७ - २०२७-२८ - २०२८-२९ - २०२९-२०३०
०-१०० - ३.८० - ३.४५ - ४.१५ - ४.६५ - ४.६५ - ५.०५
१०१-३०० - ६.५० - ५.९५ - ६.५५ - ७.०० - ६.८५ - ७.१०
३०१-५०० - ८.५० - ६.९० - ७.११ - ७.४९ - ७.२३ - ७.४१

बेस्टच्या प्रस्तावात काय?
बेस्टने २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन आर्थिक वर्षातील महसुली तुटीपोटी सुमारे १,६४६ कोटी रुपयांची मागणी केली आहे. तसेच पुढील पाच वर्षांकरिता प्रत्येक वर्षाला चार हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक महसुलाची मागणी केली आहे. बेस्टच्या सध्याच्या वीजदराचा विचार करता पुढील पाच वर्षांत विजेचे दर वाढणार असल्याचे प्रस्तावावरून दिसत आहे. दरम्यान, बेस्टचे सध्याचे वीजदर टाटा आणि अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या तुलनेत कमी आहेत.

वार्षिक महसुलाची मागणी
२०२५-२६ ------ ४,६७९ कोटी रुपये
२०२६-२७ ------ ४,६५७ कोटी रुपये
२०२७-२८ ------ ४,९१५ कोटी रुपये
२०२८-२९ ------- ५,१२३ कोटी रुपये
२०२९-३० -------- ४,९५६ कोटी रुपये
----
घरगुती ग्राहकांच्या विजेचा दर (रुपये)
वीज वापर (युनिट) - सध्याचा दर - २०२५-२६ - २०२६-२७ - २०२७-२८ - २०२८-२९ - २०२९-२०३०
०-१०० - १.८७ - २.०० - २.०५ - २.२० - २.२० - २.३०
१०१-३०० - ५.४६ - ५.५५ - ५.६० - ५.७५ - ५.७५ - ६.०५
३०१-५०० - ९.५६ - ९.४५ - ८.६५ - ८.५८ - ८.८५ - ९.१०
--------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com