वाशीमध्ये उभे राहणार शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय

वाशीमध्ये उभे राहणार शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय
Published on

वाशीमध्ये होणार शिवसेनेचे नवे मध्यवर्ती कार्यालय
नवी मुंबई, ता. १८ ः नवी मुंबईत वाशी येथे लवकरच शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय उभे राहणार आहे. वाशी सेक्टर १० येथे नवी मुंबई महापालिका रुग्णालयाच्या शेजारच्या इमारतीमध्ये भव्य स्वरूपात हे कार्यालय तयार होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यालय तयार होत असून, या कार्यालयाच्या माध्यमातून शिवसेनेच्या शिंदे गटाला बळकटी दिली जाणार आहे.
नवी मुंबईत १९८५ मध्ये शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाची स्‍थापना दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाली होती. वाशी सेक्टर १६ येथील शेरा इमारतीमध्ये हे कार्यालय होते. त्या वेळी शिवसैनिकांनी मानवी साखळी करून भरगच्च गर्दीतून बाळासाहेब ठाकरे यांना वाट काढून देत शिवसैनिक सभेपर्यंत त्यांना घेऊन गेले होते, अशी आठवण या कार्यालयाच्या उद्‌घाटनाची आहे. शिवसेनेच्या शाखा आणि मध्यवर्ती कार्यालयातून १०० टक्के समाजकारण चालले आहे. ही परंपरा यापुढे नव्या मध्यवर्ती कार्यालयातून अविरत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यादृष्टीने वाशीतील हे नवे मध्यवर्ती कार्यालय खासदारांचे जनसंपर्क कार्यालयही असणार आहे. या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेश म्हस्के हे महिन्यातील एक दिवस पूर्णवेळ बसणार आहेत. नवी मुंबईतील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या कार्यालयातून कामकाज चालणार आहे. शिवसैनिकांकरिता हे हक्काचे ठिकाण असून, या कार्यालयात पक्षबांधणी, सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बैठका आदी कामकाज चालणार आहे. त्यामुळे हे कार्यालय आगामी काळात जनतेचे आधारवड ठरेल, असे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कार्यालयाचे उद्‌घाटन होणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com