शाळांमध्ये सायबर खबरदारीचे धडे!
शाळांमध्ये सायबर खबरदारीचे धडे
कामोठ्यात दहा हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; १४ शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यशाळा
पनवेल, ता. १८ (बातमीदार) ः मोबाईलचा वाढता वापर, त्याचबरोबर ऑनलाइन आणि सायबरमध्ये होणारी फसवणूक, त्याचे दुष्परिणाम याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचे अभियान कामोठे येथील दिशा महिला मंचने हाती घेतले आहे. या वर्षाच्या पहिला दिवसापासून आतापर्यंत विविध चौदा शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारे खबरदारीचे धडे दिले जात आहेत. विशेष म्हणजे कामोठा पोलिसांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जात आहे.
सोशल मीडियाचा सध्या मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. फेसबुक, व्हाट्सॲप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, स्नॅपचॅट यासारखे सोशल मीडियाने संपूर्ण मार्केट काबीज केले आहे. त्यामध्ये विद्यार्थीसुद्धा मागे राहिले नाहीत. वेगवेगळे गेम, त्याचबरोबर रील्स याशिवाय वेगवेगळ्या ॲप्सचा वापर करून विद्यार्थी मोबाईलच्या जाळ्यामध्ये अलगद अडकले जात आहेत. त्याचबरोबर ऑनलाइन आणि सायबर क्राइमचे अनेक जण बळी ठरतात. अनेकदा त्यांच्या जीवावरसुद्धा या गोष्टी बेतात. मोबाईलचा अतिवापर ही बाब अत्यंत धोकादायक आणि घातक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या चक्रव्युहातून पाल्यांना बाहेर काढण्याचे मोठे आव्हान पालकांसमोर आहे. त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त मोबाईलचा वापर, चुकीच्या पद्धतीने सोशल माध्यम हाताळणे, ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर होणारे नुकसान या सर्व दुष्परिणामांची जाणीव करून देण्यासाठी कामोठे येथील दिशा महिला मंचच्या वतीने माध्यमिक उच्च शाळांमध्ये कार्यशाळा घेण्यात येत आहेत. वर्षाच्या पहिल्याच दिवशी रामशेठ ठाकूर स्कूलमधून कामोठे पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विमल बिडवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. मोबाईल, सोशल मीडिया, यांच्या सकारात्मक बाजूबरोबर नकारात्मक बाजूसुद्धा विद्यार्थ्यांना सांगण्यात आल्या. त्याच्यामुळे शारीरिक मानसिक, त्याचबरोबर भविष्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी नेमकी काय खबरदारी घ्यावी, याच्या टिप्ससुद्धा या कार्यशाळेमध्ये देण्यात आल्या. याशिवाय मुला-मुलींच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यात आले, तसेच शंकांचे निरसन करण्यात आले.
............
चौकट
शाळा आणि पालकांकडून कौतुक!
मोबाईल आणि सोशल मीडियाचा होणारा अतिरेक, त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम हळूहळू जाणवू लागला आहे. पार्श्वभूमीवर दिशा महिला मंचने हाती घेतलेल्या उपक्रमामुळे शालेय मुला-मुलींमध्ये प्रबोधन होऊ लागले आहे. या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन आणि पालकांकडून कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

