तीन वाहनांचा विचित्र अपघात
कासा, ता. १८ (बातमीदार) : चारोटीच्या गेटी पाडा येथे तीन वाहनांच्या विचित्र अपघातात चौघे जण जखमी आहेत. डहाणू-जव्हार राज्य मार्गावर शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला.
डहाणूच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर तीव्र वळण असल्याने रिक्षा, दुचाकी आणि कारची धडक झाली. या अपघातात कारमधील प्रीतेश आणि उषा केणी (कार प्रवासी) जखमी आहेत. तर दुचाकीवरील लखमा भावर आणि योगेश भावर तसेच दिलीप लाखात हा रिक्षाचालकही जखमी झाला. दुचाकीवरील दोघांना डोके आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना सेलवास येथील विनोबा भावे रुग्णालयात हलवण्यात आले आहे. इतरांवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कासा पोलिसांनी घटनास्थळाला भेट देताना पुढील तपास सुरू केला आहे.
----------------------------------
एअरबॅगमुळे कारचालक वाचला
तीव्र वळण असताना वाहन वेगाने चालवल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच कारमधील एअरबॅग उघडल्याने वाहनचालकाचा जीव वाचला असून, अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

