महाराष्ट्र आता गतिमान होणार

महाराष्ट्र आता गतिमान होणार

Published on

पालघर, ता. १८ (बातमीदार)ः स्वामित्व योजनेअंतर्गत मिळकत पत्रिका सनद, गावठाण क्षेत्रातील घराचे मालमत्ता पत्रक मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाले असून, महाराष्ट्राने केलेली मोठी क्रांती आहे. त्यामुळे महाराष्ट्र गतीने पुढे जाणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी पालघर येथे केले.
देशात स्वामित्व योजनेअंतर्गत मिळकत पत्रिका व सनद वितरण सुरू आहे. याच अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील स्वामित्व मिळकत पत्रिका व सनद यांच्या प्राथमिक वाटपाचा कार्यक्रम पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. या कार्यक्रमात मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते खेडेगावातील मालमत्तांचे डिजिटल मालकीपत्राचे वाटप करण्यात आले. पालघर जिल्ह्यातही भारतीय सर्वेक्षण विभागाकडून ७६७ गावांचे ड्रोन फ्लाइंग करण्यात आले आहे. त्यापैकी ५३३ गावांच्या मालमत्ता सनद तयार आहेत. त्यापैकी पालघर जिल्ह्यातील एकूण १९१ गावांमध्ये ७,८१३ नागरिकांना प्रत्यक्ष जाऊन सनद वाटप करण्यात आले, तर जिल्ह्यातील ४९ गावातील ३,५८७ नागरिकांना प्रत्यक्ष गावी जाऊन सनद वाटप केली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार डॉक्टर हेमंत सवरा, पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित, वसई विरार विधानसभेचे आमदार राजन नाईक, विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिश्चंद्र भोई, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com