मद्य प्राशन करून दुचाकी चालवणे बेतले जीवावर
नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : मद्यप्राशन करून दुचाकीवरून पामबीचवर फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या तरुणाची दुचाकी घसरून अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू; तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता. १६) पहाटे पामबीच मार्गावरील अक्षर चौकात घडली.
या अपघातातील मृत आदित्य प्रकाश जोगदंड (२२) हा करावे गाव सेक्टर-३६ मधील मातोश्री निवास इमारतीत आई व भावासह राहत होता. तो स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. त्यासाठी आदित्यने दुचाकी घेतली होती. गुरुवारी मध्यरात्री आदित्य व त्याचा मित्र सचिन शिंदे (२१) या दोघांनी करावे गाव येथील बारमध्ये दारू पिली. त्यानंतर दोघेही पामबीच मार्गावर फेरफटका मारण्यासाठी दुचाकीवरून वाशीच्या दिशेने गेले. त्यानंतर दोघेही वाशी येथून पुन्हा करावे गाव येथे परतत होते. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ते नेरूळ येथील अक्षर चौकात आले असताना, भरधाव दुचाकीवरील आदित्यचे नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी घसरून रस्त्यावर दूरवर फरपटत गेली. या अपघातात आदित्य व सचिन दोघेही गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र त्यातील गंभीर जखमी असलेल्या आदित्यचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

