टनेल बोरिंग मशिन 
तीन महिन्यांत मुंबईत

टनेल बोरिंग मशिन तीन महिन्यांत मुंबईत

Published on

टनेल बोअरिंग मशिन्स
तीन महिन्यांत मुंबईत

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या टनेल बोअरिंग मशिन्स (टीबीएम) तीन महिन्यांत मुंबईत दाखल होणार आहेत. या मशिन्स आधी ऑक्टोबर २०२४ मध्ये येणे अपेक्षित होते, मात्र काही कारणांमुळे उशीर झाला आहे. जपानमध्ये टीबीएम तयार होत असून, त्या तीन महिन्यांत मुंबईत दाखल होतील, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

शनिवारी रेल्वेमंत्र्यांनी घणसोली येथे प्रकल्प स्थळाची पाहणी केली. त्यांनी काम नियोजनानुसार सुरू असल्याचे सांगून ठाणे खाडीतील बोगद्यातून दोन बुलेट ट्रेन प्रति तास २५० किमी वेगाने एकाचवेळी धावणार असल्याची माहिती दिली. बुलेट ट्रेनच्या भूमिगत बीकेसी स्थानकाचे बांधकाम सुरू आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पातील महत्त्वाचा भाग म्हणजे २१ किमी लांबीचा भूमिगत बोगदा, ज्यातील सात किमी ठाणे खाडीखालील देशातील पहिला समुद्राखालचा बोगदा ठरणार आहे. बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान हा बोगदा तयार होत असून, १६ किमीचा भाग टनेल बोरिंग मशिन्सद्वारे तर उर्वरित पाच किमी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीने (एनएटीएम) तयार केला जात आहे.


विक्रोळी शाफ्ट २ (५६ मीटर खोली) व सावली शाफ्ट ३ (३९ मीटर खोली) यांचे काम पूर्ण झाले आहे. या शाफ्ट्सचा वापर बोगद्यांसाठी दोन टीबीएम उतरवण्यासाठी केला जाणार आहे. बीकेसीच्या दिशेने आणि अहमदाबादच्या दिशेने या मशिन्स काम करणार आहेत. एडीआयटी बोगदा मे २०२४ मध्ये विक्रमी सहा महिन्यांत पूर्ण झाला आहे. रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले की, हा प्रकल्प फक्त परिवहनासाठी नसून आर्थिक विकासाचे साधन आहे. प्रकल्पामुळे मुंबई, ठाणे, सुरत, वडोदरा, आणंद व अहमदाबाद हे एकसंध आर्थिक क्षेत्र बनणार असून, या शहरांना मोठी आर्थिक चालना मिळेल.

जलद व सुरक्षित प्रवास
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन ५०८ किमी लांब असून, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सपासून साबरमतीपर्यंतचा प्रवास दोन तास सात मिनिटांत पूर्ण होईल. बुलेट ट्रेनचे काम सध्या ३४० किमीपर्यंत प्रगत अवस्थेत असून, आधुनिक सुरक्षेचे नियम पाळले जात आहेत.

आधुनिक अभियांत्रिकीचा नमुना
बीकेसी स्थानक आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमुना ठरणार असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासी वाहतुकीत मोठी क्रांती घडवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com