दिव्यांग शिबिरात आठशे दिव्यांग सहभागी

दिव्यांग शिबिरात आठशे दिव्यांग सहभागी

Published on

जव्हार, ता. १८ (बातमीदार) : जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा तालुक्यातील दिव्यांग बालके व नागरिकांकरिता जव्हार शहरातील दिव्य विद्यालय येथे तीनदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १५ ते १७ जानेवारीदरम्यान सुमारे ८०० दिव्यांग शिबिरार्थी सहभागी झाले होते. त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी व त्यांना आवश्यक असणाऱ्या साधनसामग्रीसाठी भारत पेट्रोलियमच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून नियोजन केले होते. या वेळी लाभार्थ्यांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला.

जव्हारसारख्या भागात नागरिकांना रोजगार, शिक्षण, आरोग्याची समस्या नेहमीच भेडसावते. ही बाब लक्षात घेत श्री गुरुदेव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची २००३ मध्ये स्थापना करण्यात आली. त्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांना निवासी प्रशिक्षण मिळावे, म्हणून २००७ मध्ये दिव्य विद्यालयाची स्थापना करण्यात आली. जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक समस्यांपैकी दिव्यांगांच्या समस्या अधिक तीव्र असल्याचे लक्षात आले. त्या दृष्टीने सहा केंद्रे सुरू करून प्रत्येक केंद्राला ३५ गावांची जबाबदारी देऊन कामाला सुरुवात केली, असे श्री गुरुदेव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा प्रमिला कोकड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com