

बोर्डी, ता. १८ (बातमीदार) : १४ ते २८ जानेवारीपर्यंत असलेला मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करताना ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये, साहित्य संस्थांद्वारे राबविण्यात येत असलेले साहित्यिक उपक्रमही पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषद पालघर जिल्हाध्यक्ष प्रवीण दवणे यांनी केले. कोमसाप डहाणू शाखेतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त डहाणू येथील साहित्य दालनात शुक्रवारी (ता. १७) कथाकथन या पहिल्या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अलीकडे ऑडिओ कथा ऐकणाऱ्यांची वाढती संख्या पाहता कादंबरी, कथावाचन वगैरे प्रकारांनासुद्धा बऱ्यापैकी करियर संधी असल्याचे दवणे म्हणाले. या प्रसंगी शाखाध्यक्षा डॉ. अंजली मस्करेन्हास यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यादरम्यान डहाणू शाखा वाचन संकल्प, ऑनलाइन कविता लेखन या उपक्रमांबाबत माहिती सादर केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.