ज्येष्ठ विधितज्‍ज्ञ, वकिलांचा सत्कार

ज्येष्ठ विधितज्‍ज्ञ, वकिलांचा सत्कार

Published on

ज्येष्ठ विधिज्‍ज्ञ, वकिलांचा सत्कार
मजदूर युनियनच्या मेळाव्याला प्रतिसाद
मुलुंड, ता. १८ जानेवारी ( बातमीदार )
म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबई यांच्यातर्फे शुक्रवारी (ता. १७) राष्ट्रीय मिल मजदूर संघ, भोईवाडा येथील सभागृहात विजयी मेळावा आयोजित केला होता. या वेळी लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसाहक्क नोकरी अबाधित ठेवण्यासाठी अविरत लढणारे महाराष्ट्र राज्य महापालिका, नगरपालिका, नगर परिषद कामगार कर्मचारी फेडरेशनचे कामगार नेते, उच्च न्यायालयात प्रभावी व अभ्यासपूर्ण बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्‍ज्ञ, वकील यांचा सन्मान करण्यात आला.
लढाऊ कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस व शरद राव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्‌घाटन करण्यात आले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी फेडरेशनचे कार्याध्यक्ष व म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, स्वागताध्यक्ष संघटनेचे सरचिटणीस वामन कविस्कर, प्रस्तावना संघटनेचे कार्याध्यक्ष यशवंतराव देसाई यांनी केली. वरिष्ठ विधिज्‍ज्ञ ॲड. हरीश बळी आणि ॲड. बळीराम बी. शिंदे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य महापालिका, नगरपालिका, नगर परिषद कामगार कर्मचारी फेडरेशनचे प्रवक्ते गौतम खरात, सरचिटणीस ॲड. सुरेश ठाकूर, अनिल जाधव, संतोष पवार, मनीषा काकड यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
हिंद मजदूर सभेचे सरचिटणीस संजय वढावकर, म्युनिसिपल मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष यशवंतराव देसाई, कोषाध्यक्ष शरद राघव, म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष इंजिनिअर्स रमेश भुतेकर-देशमुख उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com