दहिसर पोलिसांच्या जनता दरबाराला प्रतिसाद

दहिसर पोलिसांच्या जनता दरबाराला प्रतिसाद

Published on

दहिसर पोलिसांच्या जनता दरबाराला प्रतिसाद
कांदिवली (बातमीदार) ः मुंबई पोलिस आयुक्तालय परिमंडळ क्रमांक १२ अंतर्गत दहिसर पोलिस ठाणे येथे तीनदिवसीय जनता दरबाराचे आयोजन कारण्यात केले होते. सहाय्यक पोलिस आयुक्त आशोक खैरनार यांच्या हस्ते उद्‌घाटन झालेल्या जनता दरबारात नागरिकांनी घरगुती भांडणे, सायबर गुन्हे, फसवणूक, आर्थिक फसवणूक आणि रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा होणारा नाहक त्रास याबाबत तक्रारी नोंदविल्या. नागरिकांनी आपल्‍या तक्रारी विनासंकोच, परखडपणे मांडल्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने, पोलिस निरीक्षक जनसंपर्क अधिकारी विवेक सोनावणे, प्रशासन अधिकारी ए. एम. देसाई, कायदा व सुव्यवस्था राम पोटे, गुन्हे अन्वेषण पोलिस निरीक्षक आशोक नाना घुगे यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्‍या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com