पीएनबी मेटलाइफची सारस्वत बँकेसह भागीदारी

पीएनबी मेटलाइफची सारस्वत बँकेसह भागीदारी

Published on

पीएनबी मेटलाइफची सारस्वत बँकेसह भागीदारी

मुंबई, ता. १८ : पीएनबी मेटलाइफ इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.ने सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेसोबत एक धोरणात्मक बँकॅश्युरन्स भागीदारी केली आहे. बचत, संरक्षण, निवृत्ती, आणि ग्रुप प्लॅन्सचा समावेश असलेल्या विविध जीवन विमा योजना सारस्वत बँकेच्या देशभरातील ३०२ शाखांमधील सुमारे ३० लाख ग्राहकांना मिळतील, असे सारस्वत बँकेच्या एमडी व सीईओ आरती पाटील यांनी सांगितले. पीएनबी मेटलाइफचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समीर बन्सल या वेळी म्हणाले, की भारतामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर विमा संरक्षण पुरेशा प्रमाणात घेतले जात नाही. त्यामुळे अधिक लोकांपर्यंत विमा पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या भागीदारीमुळे लाखो भारतीयांपर्यंत जीवन विमा सुलभपणे पोहोचविण्याच्या आमच्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल उचलले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com