

कासा, ता. १८ (बातमीदार) : डहाणू उपजिल्हा रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्रात कुपोषित बालकांच्या पालकांसाठी विशेष भेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आरोहन संस्थेच्या सहकार्याने झालेल्या या उपक्रमात रानशेत-वधना, आसवे, रायतळी-चांदवड, चरी-कोटबी आणि आगवन या ग्रामपंचायतीतील कमी वजनाच्या बालकांचे पालक सहभागी झाले होते.
४५ बालकांचे वजन आणि उंची तपासण्यात आली. त्यामध्ये १५ बालके अतितीव्र कुपोषित आढळली. या कार्यक्रमात पालकांना उपचार पद्धती, पोषण आहार, अॅनिमिया नियंत्रण आणि स्वच्छतेचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली. तसेच येथे दाखल झालेल्या बालकांच्या पालकांना आर्थिक मदतीचा लाभ मिळतो. डिस्चार्जनंतर चार फॉलोअप भेटींसाठी प्रत्येकी २५० अशी एकूण एक हजार रुपयांची रक्कम थेट पालकांच्या बँक खात्यात जमा केली जाते, असे सांगण्यात आले. पोषण पुनर्वसन केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. धीरज वाघेला यांनी सांगितले की, बालकांच्या चांगल्या आरोग्यासाठी एनआरसीमध्ये मोफत उपचार आणि पोषण आहार दिला जातो. पालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि आपल्या मुलांचे आरोग्य सुधारावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.