एपीएमसीत द्राक्षांचा हंगाम बहरला
वाशी, ता. १६ (वार्ताहर) : अवकाळी पावसाचा फटका बसल्याने यंदा द्राक्षांचा हंगाम उशिराने सुरू झाला आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या बारामती, इंदापूर, निमगाव, तासगाव या भागांतून द्राक्षांची आवक होत आहे. साधारणतः नोव्हेंबरपासून द्राक्षांच्या हंगामाला सुरुवात होत असते, मात्र यावर्षी अवकाळीमुळे द्राक्षांच्या उत्पादनात घट झाली आहे.
तासगाव परिसरातील द्राक्षे सध्या बाजारात येत असून, दिवसाला लहान-मोठ्या मिळून जवळपास १०० गाड्यांची आवक होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येते. गुरुवारी (ता. १४) एपीएमसी फळ बाजारात ७६६ क्विंटल द्राक्षांची आवक झाली. त्यामुळे भावही कमी झाले असून, घाऊक बाजारात पांढरी द्राक्षे ५० ते ६० रुपये, तर काळी द्राक्षे ९० ते १२० रुपये किलोने विकली जात आहेत. उशिराने सुरू झालेला द्राक्षांचा हंगाम पुढील महिनाभर सुरू राहणार असून, या काळात द्राक्षांची आवक वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे द्राक्षांचे भाव आणखी कमी होण्याची शक्यता, व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.
द्राक्षाचा हंगाम उशिरा सुरू झाला असला तरी आमच्याकडे नोव्हेंबरपासून द्राक्षे येण्यास सुरुवात झाली आहे. बाजारात द्राक्षांच्या हंगामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून, येत्या काळात आवक वाढेल, असा अंदाज आहे. एप्रिलपर्यंत हंगाम ओसरेल, तोपर्यंत ग्राहकांना उत्तम द्राक्षांची चव चाखायला मिळेल.
- राज चव्हाण, व्यापारी, एपीएमसी
उत्पादन कमी झाल्याने भाववाढ
ग्राहकांकडून द्राक्षाला नेहमीच मोठी मागणी असते, परंतु यंदा उत्पादन कमी असल्याने गतवर्षीच्या तुलनेत द्राक्षांचे भाव जास्त आहेत. याचा काही प्रमाणात फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. महिनाभरातील हंगामात किमान नफा मिळेल, अशी अपेक्षा व्यापारी व्यक्त करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

