जुन्या कशेडी मार्गे एसटी सुरू करण्याची मागणी

जुन्या कशेडी मार्गे एसटी सुरू करण्याची मागणी

Published on

जुन्या कशेडी मार्गे एसटी सुरू करण्याची मागणी
खेड आगाराकडे ग्रामपंचायत कशेडीचा पत्रव्यवहार
पोलादपूर, ता. १६ (बातमीदार) ः खेड बस स्थानकातून सुटणाऱ्या मुंबई, पुणे, बोरिवली, नालासोपारा, ठाणे, कल्याण मार्गावरील एसटी बस कशेडी घाट मार्गे (जुन्या मार्गे) ये-जा करत नसल्याने येथील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्‍यांना पर्यायी खासगी वाहनांचा वापर करावा लागत असल्याने खिशाला चाट बसत आहे. त्‍यामुळे पूर्वीप्रमाणे जुन्या मार्गवरून खेड आगाराच्या एसटी गाड्या पूर्ववत कराव्यात, अशी मागणी कशेडी ग्रामपंचायतीकडून खेड एसटी आगार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
खेड बस स्थानकातून सुटणाऱ्या मुंबई, पुणे, बोरिवली, नालासोपारा, ठाणे, कल्याण मार्गावरील एसटी बसेस कशेडी घाट मार्गे (जुन्या मार्गे) जाणे टाळत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्‍यामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा वापर करावा लागतो. यामुळे खाशाला कात्री लागत आहे, शिवाय ज्‍येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला यांचे हाल होत आहेत. त्‍यामुळे कशेडी ग्रामपंचायतीकडून याबाबत मागील वर्षी खेड आगाराकडे तक्रार करण्यात आली होती. यावर खेड आगार व्यवस्थापकांकडून ग्रामपंचायतीसाठी कशेडी मार्गावर गाडीचे नियोजन दिले होते, परंतु याची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याने नाराजी व्‍यक्‍त करण्यात येत आहे. वारंवार एसटीचे चालक व वाहक हे एसटीची वाहतूक नवीन महामार्गाने कशेडी बोगद्यातून करत आहेत. त्यामुळे भरणे येथे थांबलेल्या कशेडी बंगला येथील प्रवाशांना बसच्या वाहकाकडून खाली उतरविले जाते. तसेच कशेडीचे तिकीट काढलेले असूनदेखील नवीन महामार्गावर मध्येच उतरविले जाते. बस वाहकाच्या या वर्तनामुळे कशेडी गावातील प्रवाशांची खूप गैरसोय होत आहे. त्‍यामुळे कशेडी ग्रामपंचायतीकडून पुन्‍हा खेड एसटी आगाराबरोबर पत्रव्‍यवहार करण्यात आला असून, आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com