दिर्घायुष्य, आरोग्यासाठी झाडांच्या नियमित देखभालीची गरज
दीर्घायुष्य, आरोग्यासाठी झाडांच्या नियमित देखभालीची गरज
पालिकेच्या चर्चासत्रात वृक्षतज्ज्ञांनी मांडले मत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ ः पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडांचे संवर्धन महत्त्वाचे आहे. यासाठी अधिकाधिक झाडांची लागवड करणे काळाची गरज आहे. झाडांच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी त्यांची नियमित देखभाल करणे महत्त्वाचे आहे, असे मत वृक्षतज्ज्ञांनी व्यक्त केले. मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत वृक्षारोपण आणि कचरा व्यवस्थापन यावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. या वेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील अधिकारी सहभागी झाले होते.
फोर्ट येथील आरबीआय कॅम्पसमध्ये आयजी मिंट युनिटच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांसाठी वृक्षलागवड, वृक्षांची छाटणी, संगोपन आणि कम्पोस्टिंगद्वारे हरित कचऱ्याची विल्हेवाट या वैज्ञानिक पद्धतीवर व्याख्यानाचे आयोजन केले होते. या वेळी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे सादरीकरण करण्यात आले. या वेळी उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी उद्यान विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मियावॉकी पद्धतीने वृक्ष लागवडीबाबत माहिती दिली. शास्त्रीय पद्धतीने वृक्षलागवड आणि वृक्ष छाटणी या विषयांवर सहाय्यक उद्यान अधीक्षक अविनाश यादव यांनी मार्गदर्शन केले.
जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न
योग्य वृक्ष प्रजातींची निवड करून लागवड करणे आणि सिंचन पद्धती तसेच कम्पोस्टिंगद्वारे हरित कचऱ्याची विल्हेवाट लावणे, कचरा कमी करणे, पाणी वाचवणे आणि शाश्वत बागकाम पद्धतींना प्रोत्साहन देणे या विषयावर प्रकाश टाकण्यात आला. सीआयएसएफचे असिस्टंट कमांडंट राकेश कुमार यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. अधिकाऱ्यांनी पर्यावरणविषयक जागरूकता आणि टिकाऊपणाला प्रोत्साहन देण्यासाठी उद्यान विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. हा उपक्रम सरकारी संस्था आणि सुरक्षा दलासह विविध समूहांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सुरू असलेल्या महापालिकेच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

