विद्यार्थ्यांसाठी छावा चित्रपटाचे मोफत शो
विद्यार्थ्यांसाठी ‘छावा’ चित्रपटाचे मोफत शो
घाटकोपर, ता. १६ (बातमीदार) ः छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘छावा’ या चित्रपटाचे विद्यार्थ्यांसाठी मोफत शोचे आयोजन करण्यात आले. शंभूराजे प्रतिष्ठान आणि ॲम्बिशन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाचे आज (ता. १६) घाटकोपर पूर्वेतील ओडियन चित्रपटगृहात शो पार पाडला. सहा वर्षांपासून ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांनी हा चित्रपट पाहिला. मुले हिंदी चित्रपटातील हीरोंकडे आकर्षित होत असतात; पण हिंदवी स्वराज्याचे खरे हीरो हे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आहेत, हे मुलांना ऐतिहासिक चित्रपटातून समजावे, या उद्देशाने आम्ही ‘छावा’ या चित्रपटाचे मोफत आयोजन केल्याचे आयोजक आदेश दरेकर, गौरव दरेकर यांनी माहिती देताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

