व्यावसायिकाला एक कोटीचा गंडा

व्यावसायिकाला एक कोटीचा गंडा

Published on

व्यावसायिकाला एक कोटीचा गंडा
मालाडमधील घटना; गुन्हा दाखल
अंधेरी, ता. १६ (बातमीदार) ः शासकीय कंत्राट मिळाल्याची बतावणी करून एका वृद्ध व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी दीपक शर्मा या व्यावसायिकाविरुद्ध दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर एक कोटीचा अपहार करून फसवणूक केल्याचा आरोप असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
वृद्ध तक्रारदार मालाड येथे राहत असून दीपक हा त्यांचा परिचित व्यावसायिक आहे. त्याची एक खासगी कंपनी असून या कंपनीला उत्तर प्रदेश सरकारकडून वाळू सप्लायचे एक मोठे कंत्राट मिळाले आहे. त्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. काम पूर्ण करण्यासाठी त्याने आर्थिक मदत करण्याची विनंती करून तीन टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखविले होते. त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी त्याला एक कोटी रुपये दिले होते; मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना व्याजाची रक्कम दिली नाही.
अधिक चौकशी केली असता त्याला उत्तर प्रदेश सरकारकडून कुठलेही वाळू सप्लायचे कंत्राट मिळाले नसल्‍याचे समोर आले. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे एक कोटीची मागणी सुरू केली होती; मात्र त्याने ती रक्कम न देता या रकमेचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केला होता. त्‍यानंतर याबाबत दिंडोशी पोलिस ठाण्यात त्‍यांनी तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com