रोबोटिक्सचे प्रशिक्षण देणारी एस. एस . निकम स्कूल
एस. एस. निकम शाळेत रोबोटिक्स एआयचे प्रदर्शन उत्साहात
माणगाव, ता. १९ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक विश्वात आपल्या क्रांतिकारी बदलांनी सतत प्रकाशझोतात असलेल्या माणगाव येथील एस. एस. निकम इंग्लिश स्कूलमध्ये दि. १४ व १५ फेब्रुवारी असे दोन दिवस ''रोबोटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता'' या विषयावरील रायगड जिल्ह्यातील पहिलेच मॉडेल प्रदर्शन अतिशय वैज्ञानिक वातावरणात संपन्न झाले. सदर प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ते (एआय)वर कार्य करणारी अनेक उपकरणे आणि रोबोट्स प्रदर्शित केले. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे रोबोटिक्स विषयातील तज्ज्ञ प्रोफेसर डॉ. हर्षदीप जोशी यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन डॉ. मदन निकम होते, तर माणगावच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, उपनगराध्यक्ष हर्षदा काळे, माणगाव मेडिकोजच्या अध्यक्षा डॉ. स्नेहा राऊत, खजिनदार डॉ. सायली चुटके, स्टेम रोबो कंपनीचे इंजिनिअर वरून घोळे, शिक्षणाधिकारी कार्यालय अलिबागचे अधीक्षक सुभाष शिंदे, माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे सेक्रेटरी सुभाषभाई मेथा, खजिनदार अमृतभाई दोशी, संस्थेचे पदाधिकारी व सभासद आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक, प्रतिष्ठित नागरिक व सामान्य जनतेने भेट देऊन विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

