धोकादायक खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण
धोकादायक खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण
ठाणे शहर, ता. १६ (बातमीदार) : वाहनांची गती कमी करण्यासाठी ठाणे शहरात विविध रस्त्यांवर गतिरोधक तयार केले आहेत; मात्र हे गतिरोधक धोकादायक झाले आहेत. अशा धोकादायक गतिरोधकांमुळे अपघात होऊ लागले आहेत. ठाणे शहरातील बहुतांश रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनवले आहेत. अशा रस्त्यांमुळे वाहनचालकांकडून उत्साहात वाहतूक केली जाते. त्यामुळे हे रस्ते अपघाताला कारण ठरत असल्याने ठाणे महापालिकेने शहरातील अंतर्गत रस्त्यांवर गतिरोधक तयार केले आहेत.
गतिरोधकांमुळे वाहनांच्या गतीला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे; मात्र या गतिरोधकांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे ते आता अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात गतिरोधकांमुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. न्यायालयाने बंदी घातलेले गतिरोधक येथे बसवल्याने रुग्णवाहिकांना त्यावरून रुग्ण घेऊन जाताना प्रचंड धक्के बसतात. गंभीर अवस्थेतील रुग्ण येथून घेऊन जाणे कठीण होऊ लागले आहे. तर गोकुळ रोड आणि कोलशेत रोडवर बांधलेले गतिरोधक उखडल्याने अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

