तिरुपती येथे भरणार जगातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन आणि प्रदर्शन
तिरुपती येथे भरणार जगातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन आणि प्रदर्शन
प्रभादेवी, ता. १६ (बातमीदार) : जगभरातील मंदिर परिसंस्थांना एकमेकांसोबत जोडण्यासाठी, त्यांना बळकट आणि त्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी तसेच एक गतिमान व्यासपीठ प्रदान करण्यासाठी तिरुपतीमध्ये जगातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन आणि प्रदर्शन भरणार आहे. टेम्पल कनेक्ट आणि अंत्योदय प्रतिष्ठानच्या वतीने चर्चगेट येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत टेम्पल कनेक्टचे संस्थापक गिरीश कुलकर्णी आणि आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाचे अध्यक्ष प्रसाद लाड यांनी ही माहिती दिली.
हे आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन, प्रदर्शन १७ ते १९ फेब्रुवारी २०२५दरम्यान तिरुपती येथील आशा कन्व्हेशन येथे आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ५८ देशांमधील सुमारे १ हजार ५८१ भक्ती संस्थांचा सहभाग असेल आणि प्रदर्शनामध्ये १११ हून अधिक वक्ते, १५ कार्यशाळा, ज्ञानसत्रे आणि ६० हून अधिक दुकाने असतील. याअंतर्गत निधी व्यवस्थापन, गर्दी नियंत्रणापासून ते शाश्वतता आणि सुरक्षा शिष्टाचार, एआय, डिजिटल साधने आणि फिनटेक तंत्रज्ञानाद्वारे मंदिर व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण करण्यासारख्या विषयांवर विशेष भर दिला जाईल. लंगर आणि अन्न वितरण प्रणाली, कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर, शाश्वत ऊर्जा पद्धती आणि कायदेशीर अनुपालन यांसारख्या विषयांवर मुखत्वे लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

