‘फनस्ट्रीट’मध्ये रमले बालक-पालक
विरार, ता. १६ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेचा क्रीडा विभाग, तसेच जागरूक नागरिक संस्था व युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. १६) आयोजित ‘फनस्ट्रीट’मध्ये शेकडोंच्या संख्येने लहान मुले व पालक सहभागी झाले होते. या उपक्रमांर्तगत एकाच ठिकाणी अनेक पारंपरिक व इतर खेळांची संधी उपलब्ध झाल्याने नागरिकांनी मोठ्या उत्सवाने आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
मल्लखांब, भवरा, चमचा लिंबू, लगोरी, दोरी उड्या, गोट्या, सायकलचा टायर फिरविणे, त्याचबरोबर एरोबिक्स, जिम्नॅस्टिक, बुद्धिबळ, चित्रकला, कराटे, फुटबॉल, योग, स्केटिंग, सायकलिंग, बॅडमिंटन, बॉक्सिंग, तायक्वांदो, झुम्बा अशा अनेक खेळांमध्ये नागरिकांनी मुलांसह सहभाग नोंदवला. या उपक्रमामध्ये माजी महापौर नारायण मानकर, प्रवीण शेट्टी, माजी सभापती संदेश जाधव, प्रतेश पाटील, वसई तालुका कला-क्रीडा मंडळाचे सचिव प्रकाश वनमाळी, माजी नगरसेवक मनिष वर्तक, उपायुक्त सदानंद पुरव, सहाय्यक आयुक्त ग्लिसन घोन्साल्वीस, अलका खैरे, अधीक्षक गणेश पाटील, जागरूक नागरिक संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभ राऊत, वैभव ठाकूर, युवा प्रतिष्ठानतर्फे सनी मोसेकर आदि उपस्थित राहून कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

