घुसखोरांविरोधात एपीएमसीत जनजागृती
वाशी, ता. १६ (वार्ताहर) : नवी मुंबईतील एपीएमसी पोलिसांकडून फळ बाजारातील बांगलादेशी घुसखोरांविरोधात जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे. शनिवारी (ता. १५ ) एपीएमसी फळ बाजारात व्यापारी, माथाडी कामगार, वारणार, तोलणार इत्यादी बाजार घटकांसोबत एपीएमसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय शिंदे यांनी संवाद साधला. या वेळी अवैधरीत्या घुसखोरी केलेल्या बांगलादेशींवर कारवाई करण्यासाठी बाजार घटकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
काही दिवसांपासून शहरात अवैधपणे प्रवेश केलेल्या बांगलादेशी नागरिकांवर पोलिसांची धडक कारवाई सुरू असून, एपीएमसी फळ बाजारातही घुसखोरीची शक्यता व्यापारी आणि बाजार घटकांनी वर्तवली आहे. फळ बाजारात परप्रांतीय कामगारांबरोबरच बांगलादेशी नागरिकही मोठ्या प्रमाणात काम करत असल्याची शंका बाजार घटकांकडून व्यक्त केली जात होती. गतवर्षी सप्टेंबरमध्ये आयोजित कामगार मेळाव्यातही हा मुद्दा उपस्थित झाला होता. या वेळी एपीएमसी फळ बाजारात जवळपास पाच हजार बांगलादेशी नागरिक घुसखोरी करून काम करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या घुसखोरीमुळे स्थानिक कामगार आणि माथाडी कामगारांच्या रोजगारावर परिणाम होत असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले होते. त्यानंतर एपीएमसी पोलिसांकडून याबाबत पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे.
बाजार घटकांनी अवैध घुसखोरांविषयी माहिती पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त राहील. तसेच बाजारात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना जर कोणी आश्रय देत असेल तर ते देखील कायद्याने गुन्हा आहेत. त्यामुळे अशांवरही कठोर कारवाई करण्यात येईल.
- अजय शिंदे, वरिष्ठ निरीक्षक, एपीएमसी पोलिस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

