संघटन बळकटीकरणासाठी भाजपचे नवे स्‍फूर्तिगीत

संघटन बळकटीकरणासाठी भाजपचे नवे स्‍फूर्तिगीत

Published on

संघटन बळकटीकरणासाठी भाजपचे नवे स्‍फूर्तिगीत
मुख्यमंत्र्यांच्या हस्‍ते अनावरण
मुंबई, ता. १६ ः भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात संघटन बळकट करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. पक्षाच्या सदस्यता वाढीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेले स्फूर्तिगीत हा त्याचाच एक भाग असून, या ऊर्जादायी गाण्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील सदस्यता महाअभियान २०२५ अंतर्गत करण्यात आले. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून हे गाणे बनवण्यात आले आहे.
सुप्रसिद्ध गायक सुहास सावंत यांनी हे स्फूर्तिगीत गायले असून गीत आणि संगीत श्रेयस राज आंगणे यांनी दिले आहे. डोंबिवलीकर स्टुडिओज यांनी निर्मिती केली आहे. या गाण्यातून पक्षाचे नेतृत्व, कार्यपद्धती, कार्यकर्त्यांची एकनिष्ठता आणि त्यांच्या समर्पणाचे चित्रण करण्यात आले आहे. विविध प्रचारसभांमध्ये तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून या गाण्याचा प्रसार करून पक्ष संघटन मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.
पक्षाच्या विचारधारेचा प्रचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा आणि पक्षाच्या कार्यशैलीविषयी जनतेमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या हेतूने स्फूर्तिगीताची संकल्पना मांडण्यात आल्याचे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com