

मार्शल आर्ट स्पर्धेत मुंबईच्या संघाचे यश
मुंबई, ता. १६ ः छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकत्याच पार पडलेल्या शस्त्रांग मार्शल आर्टच्या सातव्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मुंबईच्या मुले व मुलींनी मोठे यश मिळविले. त्यात ५००हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
पशुपती नकूर, मंगेश शिर्के, गौरांग ठाकूर, अखिलेश राणे, अपूर्वा मोहिते, क्रिशिल पिंटो, वंशिका कदम, अथर्व अणावकर, सानिका चव्हाण, रुद्र बनसोडे, सई वालावलकर, आराध्य वालावलकर, केयूश पटेल, मीनाक्षी राऊत, अक्षय गुप्ता, आरुष जैन, सार्थक राऊत, नियांशू पेठे, स्वरा ननावरे, श्रेयश गिरमे, आराध्य कानडे, आरूष विश्वकर्मा, आलिया आगलावे, हर्षाली राठोड यांनी सुवर्णपदक पटकावले. तसेच अभिनव सिंग, अथर्व भुवड, सिद्ध व्यास, देवांश मांडे यांनी रौप्यपदक व सर्वेश शिंदे, अभिनव परब यांनी कांस्यपदक पटकावले. तब्बल २८ सुवर्णपदके, चार रौप्यपदके व दोन कांस्यपदके मिळवून मुंबई जिल्हा पहिला क्रमांकावर आला. प्रशिक्षक मंगेश शिर्के, पशुपती ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.