कसारा रेल्वेपुलाचे काम संथगतीने
कसारा रेल्वेपुलाचे काम संथ गतीने
बंद रस्त्यामुळे नागरिकांना पाच किमीचा वळसा
खर्डी, ता. १८ (बातमीदार): कसारा येथे जुना मुंबई-नासिक महामार्गाला जोडणारा पूल रेल्वेलाइनवर आहे. कसारा गावातून पूर्व-पश्चिम अशी वाहतूक या पुलावरून होत असते, परंतु या ब्रिटिशकालीन पुलाची दुरवस्था झाली असून, तो पूल कमकुवत झाला आहे. त्याची दुरुस्ती गेल्या दोन वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे येथील रस्ता बंद करण्यात आला आला. त्यामुळे स्थानिक नागरिकांना पाच ते सहा किमीचा वळसा घालून कसारा बाजारपेठेत जावे लागत आहे.
मध्य रेल्वेच्या कसारा येथील ब्रिटिशकालीन पुलाची दुरुस्ती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या आधी करावी, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात येते. त्यामुळे या मिरवणुकीत कोणताही अडथळा येणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन राष्ट्रीय काँग्रेसचे कसारा विभागाचे अध्यक्ष रमाकांत पालवे यांनी जिल्हाधिकारी, मध्य रेल्वे अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
अवजड वाहनांना प्रवेशबंदी
कसाऱ्यात दरवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, तानाजी नगर, आनंद नगर ते मिलिंद नगरपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत १५/१६ हजारांच्या आसपास भीम अनुयायी उपस्थित असतात; मात्र मागील दोन वर्षांपासून काम कासवगतीने सुरू आहे. सध्या त्या ठिकाणी गर्डरचे काम सुरू आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिमची मोठ्या वाहनांची वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक व रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे.
फोटो-कसारा रेल्वेपुलावरील गर्डरमुळे बंद असलेला रस्ता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

