

लाडक्या बहिणींचा मतांसाठी वापर : जितेंद्र आव्हाड
अंबरनाथ ता. १८ (वार्ताहर) : लाडक्या बहिणींची नावे कापल्यास तुम्ही मतांसाठी महिलांना लाच दिली हे सिद्ध होईल, पण आम्ही योजनेतून नाव कापू देणार नाही, असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अंबरनाथमध्ये पार पडलेल्या हळदी-कुंकू समारंभात दिला.
राज्यात विधानसभेपूर्वी राबवलेली ''लाडकी बहीण योजना'' आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अनेक लाडक्या बहिणींची नावे अपात्रतेच्या नावाखाली योजनेतून कापण्यात आली. त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या पाहायला मिळत आहेत. दरम्यान, लाडक्या बहिणींची नावे कापल्यास तुम्ही मतांसाठी महिलांना लाच दिली, हे सिद्ध होईल, असे वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या हळदी-कुंकू समारंभात रविवारी (ता. १६) सरकारने लाडक्या बहिणींची नावे कापली, तर आम्ही या भगिनींना घेऊन मंत्रालयात आंदोलन करणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला.
अंबरनाथ पूर्व मोतीराम पार्क येथील गणेश मंदिराच्या मैदानात रविवारी (ता. १६) सदामामा पाटील प्रतिष्ठानतर्फे भव्य हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले होते. या वेळी अंबरनाथमधील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या समारंभाला ठाणे जिल्हा निरीक्षक ऋता आव्हाड, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा महिला आघाडी विद्या वेखंडे, शहर अध्यक्ष सदाशिव पाटील, महिला शहर अध्यक्ष पूनम शेलार, माजी ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेकडो महिला उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.