मुलुंड पोलिस स्टेशनच्या वतीने नवीन कायद्याबाबत जनजागृती
मुलुंड पोलिस स्टेशनच्या वतीने कायद्याबाबत जनजागृती
मुलुंड, ता. १८ (बातमीदार) : भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक न्याय संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम २०२३ या तीन नवीन गुन्हेगारी कायद्यांबद्दल माहिती देण्यासाठी कार्यशाळा पार पडली. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती देण्यासाठी मुलुंड पोलिस स्टेशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ॲड. संतोष दुबे, पोलिस उपायुक्त विजयकांत सागर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय जोशी, हिरालाल मृग, संदीप पोपट उपस्थित होते. या कार्यशाळेदरम्यान संतोष दुबे यांनी जुन्या आणि नवीन कायद्यातील फरक समजावून सांगितला. कार्यशाळेनंतर जनतेने प्रश्नोत्तरांचे सत्र सुरू करून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. त्यानंतर वाढत्या सायबर क्राइमवर अशीच कार्यशाळा घेणार असल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

