नियुक्ती होऊनही वेतनापासून वंचित

नियुक्ती होऊनही वेतनापासून वंचित

Published on

नियुक्ती होऊनही वेतनापासून वंचित
मुंबई अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची अवस्था
मुलुंड, ता. १८ (बातमीदार) : मुंबई अग्निशमन दलामध्ये मनुष्यबळ कमी असल्यामुळे आग तसेच इतर मोठ्या दुर्घटनांत मुंबईतील जनतेच्या जीविताचे तसेच मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी ९१० पैकी ७८५ अग्निशामकांची पदे भरली गेली. त्यामध्ये उर्वरित २३५ अग्निशामकांची १६ ऑगस्ट २०२४ रोजी दलात नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीला सहा महिने होत आले तरी काही जणांचा प्रशिक्षण भत्ता व वेतन अद्याप मिळालेले नाही. निवड झालेले अनेक उमेदवार हे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आले आहेत.
या जोखमीच्या खात्यामध्ये नोकरी करीत असतानाही त्यांना एक वेळचे जेवण करण्यासाठीसुद्धा पैसे मिळत नसल्याची परिस्थिती त्यांच्यावर ओढावली आहे. यासंदर्भात मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेने ४ ऑक्टोबर २०२४ रोजी पत्रव्यवहार करून १७ डिसेंबर २०२४ रोजी अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांच्यासोबत चर्चा केली होती; तरीही कर्मचाऱ्यांच्या पगाराकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
या बाबतीत मुंबई अग्निशमन दल आस्थापना व बृहन्मुंबई मुख्यालय संगणक विभाग यांच्यामध्ये कुठलाही ताळमेळ व समन्वय नसल्याने तसेच प्रशासकीय उदासीनतेमुळे पगार अडकला आहे. पगार न मिळाल्याने जवान हतबल झाले आहेत. तरी त्यांना १ मार्च रोजी पगार मिळावा, अशी मागणी पत्राद्वारे महापालिकेकडे संघटनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com