सोन्याच्या मूर्ती चोरल्याने नोकरावर गुन्हा

सोन्याच्या मूर्ती चोरल्याने नोकरावर गुन्हा
Published on

सोन्याच्या मूर्ती चोरल्याने नोकरावर गुन्हा
भिवंडी, ता. १८ (बातमीदार) : दापोडा गावात कुरियरचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याच्या कार्यालयातून रविवारी (ता. १६) सायंकाळी सोन्याच्या मूर्ती चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नोकराविरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संदीपकुमार रामजंस भारतीय (३०) असे गुन्हा दाखल झालेल्या नोकराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपिन दयाशंकर तिवारी (४२) हे कल्याण पूर्व या ठिकाणी राहतात. त्यांच्या कुरियरच्या व्यवसायाचे कार्यालय तालुक्यातील दापोडा गावात धनराज कंपाउंडमधील कृष्णा कॉम्प्लेक्समध्ये आहे. संदीपने रविवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास कार्यालयात असलेल्या देव्हाऱ्यातील गणपती, सरस्वती व लक्ष्मी अशा ६९ ग्रॅम वजनाच्या व तीन लाख १० हजार रुपये किमतीच्या तीन सोन्याच्या मूर्ती चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी विपिन यांच्या फिर्यादीवरून संदीपकुमार याच्या विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार चव्हाण करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com