म्‍हसळा, श्रीवर्धनमधील आमसभेकडे दुर्लक्ष

म्‍हसळा, श्रीवर्धनमधील आमसभेकडे दुर्लक्ष

Published on

म्‍हसळा, श्रीवर्धनमधील आमसभेकडे दुर्लक्ष
नागरी समस्या मांडणार कोठे? ग्रामस्‍थांचा लोकप्रतिनिधींना सवाल
श्रीवर्धन, ता. १८ (बातमीदार) : म्हसळा, श्रीवर्धन या दोन्ही तालुक्‍यांत शेकडो गावे-पाडे जोडली आहेत. या तालुक्यांना एक आमदार, मंत्री व एक खासदार लाभले असूनही गेल्या कित्येक वर्षांत येथे एकही आमसभा झालेली नाही. त्‍यामुळे विकासाचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळत नसल्याची ओरड ग्रामस्‍थांकडून करण्यात येत आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार तालुका पंचायत समितीच्या वतीने वर्षाला किमान एकदा आमसभा घेणे गरजेचे असते. या आमसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे त्या मतदारसंघातील विधानसभेचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी असतात, तर गटविकास अधिकारी हे सचिव असतात, मात्र गेल्या चार वर्षांपासून तालुक्यात आमसभा पार पडलेली नाही. त्‍यामुळे जनतेचे विविध प्रश्न, समस्या आमसभेत चर्चेत घेऊन ते सोडवण्याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. या दोन्ही तालुक्यांत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आदिती तटकरे या आमदार आहेत. तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत डोळेझाक करण्यात येत आहे. आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद तसेच श्रीवर्धन नगरपालिका निवडणुका प्रलंबित असल्याने येत्या काळात कधीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्याआधी आमसभा होणे गरजेचे असून, तालुक्यातील जनतेचे प्रलंबित प्रश्न आमसभेत मांडता येतील, अशी मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील तहसील कार्यालय, पंचायत समिती, भूमी अभिलेख कार्यालय, कृषी विभाग, आरोग्य विभाग, जलसंधारण, जलसंपदा विभाग, बांधकाम विभाग, संजय गांधी व श्रावण बाळ योजना, महावितरण या विभागाशी निगडित सामान्य जनतेचे, शेतकरीबांधवांचे, तसेच दिव्यांगबांधवांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्‍यामुळे आमसभा घेतल्यास विविध प्रश्नांची सोडवणूक होऊन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळू शकेल. त्‍यामुळे लवकरात लवकर आमसभा घेण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्‍थांकडून करण्यात येत आहे.
.......................
शेवटची आमसभा २०१२
श्रीवर्धन पंचायत समिती अंतर्गत ९ जुलै २००९ आणि ३ डिसेंबर २०१२ आशा दोन आमसभा खासदार सुनील तटकरे हे आमदार असताना झाल्या होत्या, मात्र त्यानंतर १२ वर्षे आमसभा झाली नाही. आमदार आदिती तटकरे या जनता दरबार घेतात. ज्यात नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.
.....................
पूर्वी दरवर्षी आमसभा होत असत. गावखेड्यातील नागरिक आपापल्या अडचणी सभेत मांडत असत. यामुळे लोकांच्या समस्या वेळेवर सुटण्यास मदत होत होती. त्‍यामुळे अशा आमसभा होणे आवश्यक आहे. आमदारांनी या आमसभेकडे लक्ष द्यावे.
- गजू भाटकर, शिवसेना शाखाप्रमुख, बोर्लीपंचतन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com