तंबाखूमुक्त शालेय परिसर योजनेअंतर्गत जागरूकता कार्यक्रम

तंबाखूमुक्त शालेय परिसर 
योजनेअंतर्गत जागरूकता कार्यक्रम
Published on

तंबाखूमुक्त शालेय परिसर
योजनेअंतर्गत जागरूकता कार्यक्रम
मुलुंड, ता. १८ (बातमीदार) ः तंबाखूमुक्त शालेय परिसर योजनेंतर्गत नवघर पोलिस ठाणे हद्दीतील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जागरूकता कार्यक्रम सोमवारी (ता. १७) आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात नवघर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश पाटील, महिला पोलिस उपनिरीक्षक धनश्री कदम, महिला पोलिस उपनिरीक्षक रूपाली सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे व त्याचे दुष्परिणाम याबद्दल माहिती दिली. मुलुंड पूर्वेतील वामनराव मुरंजन महाविद्यालयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात नवघर पोलिस ठाण्यांतर्गत १० शाळा आणि आठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते. पोलिस उपनिरीक्षक रूपाली सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीच्या विविध उपाययोजनांबद्दल मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com